Monday, 9 January 2017

भास

                                              भास  
 नकळत  कळले मला हे ,
तो भास माझा होता
दुखले हे माझे मन पण,
तो खास माझा होता 
हृदयाच्या कोपऱ्यात,
निवास त्याचा होता 
प्रत्येक क्षणोक्षणी ,
आभास  त्याचा होता  
..... नकळत कळले मला हे, 
   तो भास माझा होता 
जगले जरी मी क्षणभर ,
हा प्राण त्याचा होता 
ओढावले जणू मी,
हा नाद त्याचा होता 
अस्तास जीव माझा ,
तो उदय माझा होता 
जगण्याला अर्थ आता का,
तो थाट माझा होता 
..... नकळत कळले मला हे ,
तो भास माझा होता